#औरंगाबाद-जालना रोडवर शेकटा येथे अंगावर शहारे आणणारा अपघात घडला.हा अपघात CCTV कॅमेरात कैद झाला आहे.<br />दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला.एक दुचाकीस्वार आपल्या पत्नी आणि मुलासोबत जात असताना त्याने युटर्न घेतला.त्याचवेळी मागून येणाऱ्या कारची दुचाकीला जबर धडक बसली.मात्र अपघातानंतर कारचालकाने गाडी न थांबवता तिथून पळ काढला.या अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.